'कांद्याने लोकसभेत कंबरडं मोडलं चूक मान्य करतो...' अजित पवारांची निफाडमध्ये कबुली

Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा गुरूवारपासून सुरू झालीय. शुक्रवारी अजित पवार नाफेडमध्ये होते, यावेळी त्यांनी कांदा प्रश्नामुळे लोकसभेत कंबरडं मोडल्याची कबुल अजित पवार यांनी दिलीय.

राजीव कासले | Updated: Aug 9, 2024, 03:38 PM IST
'कांद्याने लोकसभेत कंबरडं मोडलं चूक मान्य करतो...' अजित पवारांची निफाडमध्ये कबुली title=

Ajit Pawar : कांद्याने फटका बसल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलीये. लोकसभेमध्ये कंबरडं मोडल्याचं म्हणत, चूक झाल्याचं म्हणत अजित पवारांनी शेतकऱ्यांची माफी मागितलीये. कांदा निर्यात बंदी (Onion Export Ban) होऊ देणार नसल्याचं आश्वासन अजित पवारांनी निफाडमध्ये (Nifad) दिलंय. कोणत्याही परिस्थितीत कांदा निर्यात बंदी होऊ देणार नाहीत, असं आश्वासनही अजित पवार यांनी दिलं आहे. तसंच सरकारच्या सगळ्या योजनांची पदाधिकाऱ्यांनी माहिती घ्या आणि जनतपर्यंत पोहोचवा अशा सूचना अजित पवार यांनी केल्यात. 

मी आात विरोधकांवर टीका करणार नाही, कारण माझ्याकडे सांगायला खूप काम असल्यांच अजित पवार यांनी म्हटलंय. खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरु आहे. लाडकी बहिण योजना बंद निवडणुकांनंतर बंद होईल अशी विरोधकांकडून ओऱ केली जात आहे. पण ही योजना बंद होणार नाही, कायमस्वरुपी सुरु राहिल, ही योजना सुरु राहावी यासाटी आम्हाला तिथे पाठवलं पाहिजे, त्यासाठी बटण दाबलं पाहिजे असं आवाहन अजित पवार यांनी केलंय. आधी मुलगी जन्माला नको होतं, अस चालणार नाही मुलगी जन्माला आली पाहिजे. मुलगी जन्माला आल्या तर 18 वर्षा पर्यत 1 लाख 1 हजार रुपये मिळणार अशी योजना आहे. जुळ्या झाल्या तर दोन्ही मुलींना 1 लाख मिळणार असंही अजित पवार यांनी सांगितलं.

मी चांगलं काम घेऊन तुमच्या कडे आलो आहे, त्यामुळे मला तुमची साथ हवी आहे. महायुती ला साथ हवी आहे असं भावनिक आवाहनही अजित पवार यांनी केलंय. 

राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा
नाशिकच्या दिंडोरीतून अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला सुरूवात झालीय.. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवारांनी विधानसभा प्रचाराला सुरूवात केल्याचं पाहायला मिळतंय..जनसन्मान यात्रेदरम्यान अजितदादा देवदर्शनही घेणार आहेत. यात्रेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी नाशिकच्या काळारामाचं दर्शन घेतलं. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सुरू आहे. तसंच जनता जनार्दनासोबतच देवाच्या दरबारात हजेरी लावून विधानसभा विजयाचं साकडंही ते यानिमित्तानं घालणार आहेत.

विरोधकांचा अजित पवारांना टोला
जो बुंद से गये वो, हौदसे नहीं आते. आता माफी मागून काय फायदा. गुजरातच्या शेतकऱ्यांना न्याय मिळतो, मग महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय का नाही मिळाला. हे दिल्लीला फक्त सरकार वाचवण्यासाठी गेले होते, कांद्याला दर मिळवून आणला असता तर ही वेळ आली नसती असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. 

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवरून अमोल कोल्हेंनीही निशाणा साधलाय. नागपंचमी आपण का साजरी करतो? याची सर्वांना कल्पना आहे...पण सध्या गुलाबी रंगाची पुंगी काढून जनता डोलते की काय? हे पाहण्यासाठी एक यात्रा निघालीय...जनता स्वाभिमानी आहे. ती हे सगळं जाणून आहे...असा टोला कोल्हेंनी अजित पवारांना लगावलाय.