....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका

Rohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 9, 2024, 01:20 PM IST
....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका title=

हेमंत चापुडे; झी मीडिया; पुणे : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना सुबत्ता आणि आधार देण्याच्या हेतून 'लाडकी बहिण' योजना सुरु कपरण्यात आली. मात्र यापेक्षा महिलांना नेमकं काय हवंय? याबाबत शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिनी खडसे यांनी या मुद्द्याला वाचा फोडली. 

महिलांना पैसे नकोत पण महिलांना नेमकं काय हवंय? याबाबत आताचं सरकार अज्ञानी असल्याची टिका रोहिणी खडसे यांनी केली आहे. आताच्या सरकारला महिला समजल्याच नसल्याचा आरोप देखील रोहिणी खडसेंनी केला आहे. 

काय म्हणाल्या रोहिणी खडसे? 

'लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवाय. आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे? तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? पण या निर्लज्ज सरकारला याचं काही देणं-घेणं नाही. त्यामुळं ह्यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच. ह्यांना वाटतं महिलांचे मन फक्त पैशात अडकले आहे' असं म्हणत रोहिण खडसे यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली.

रोहिणी खडसे यांनी यापुर्वीही सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले ते म्हणाले एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका राज्यात वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

(हे पण वाचा - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे तेव्हाच मिळतील, जेव्हा अर्जावर असेल 'ही' नोंद) 

गेल्या महिन्यात उरण आणि कल्याण शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना या मन सून्न करणाऱ्या आहे. या घटनांमुळे माणुसकीला काळीमा फासली आहे. जिथे सरकार प्रगतशील महाराष्ट्र म्हणत आहे तेथे महिलांवर असे असत्याचार होत असताना. महिलांसाठी 'लाडकी बहिण' योजना राबवली जाते. पण ही योजना खरंच महिलांसाठी गरजेची आहे. महिलांना सरकारकडून नेमकं काय हवं याबाबतही माहिती जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे.