MGNREGA Job 2023: आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी संसाधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण आणि पारदर्शकता सोसायटीच्या पॅनलवर केली जाणार आहे. याअंतर्गत संसाधन व्यक्ती पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.


भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 'ही' घ्या अर्जाची लिंक


संसाधन व्यक्ती (Resource Person)  पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.


यासाठी 3 ऑगस्टपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना, पदासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या कार्यालयाच्या www.aurangabad.gov.in या वेबसाईवर प्रसिध्द करण्यात आला आहे. यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद या पत्त्य़ावर पाठवायचे आहेत.


उमेदवारांनी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज या कार्यालयात 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावेत.  कागदपत्रे सोबत नसलेले आणि अपूर्ण माहितीसह प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.


Bank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार


नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती


नाशिक जिल्हा परिषद भरती अंतर्गत ग्रामसेवक (कंत्राटी) - 50, आरोग्य पर्यवेक्षक - 3, आरोग्य परिचारिका - 597, आरोग्य सेवक (पुरुष) - 85, आरोग्य सेवक (पुरुष - हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी - 126, औषध निर्माण अधिकारी - 20, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 14, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) - 2, विस्तार अधिकारी - शिक्षण (वर्ग 3, श्रेणी 2) - 8, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) - 3, पशुधन पर्यवेक्षक - 28, कनिष्ठ आरेखक - 2, कनिष्ठ लेखा अधिकारी - 1, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) - 5, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) - 22, मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका - 4, कनिष्ठ यांत्रिकी - 1, कनिष्ठ अभियंता (स्थापत्थे) - 34, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - 33, लघुलेखक (उच्च श्रेणी) - 1 ही पदे भरली जातील. यासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखांची माहिती अधिकृत वेबसाइटवर 7 दिवस आधी देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी येथे भेट देणे आवश्यक आहे. 25 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.