Mhada Lottery 2023 : मुंबईत स्वत:चे घर असावे,अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. वर्षभरापासूनची कोकण मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा आता संपणार आहे. (Konkan Mhada Lottery) कोकण मंडळाच्या घरांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात निघणार आहे. तब्बल 4000 घरांची सोडत निघणार आहे. (Konkan Mhada Advertisement 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे, नवी मुंबई येथे ही मोक्याच्या ठिकाणी घरे आहेत. सुमारे चार हजार घरांच्या सोडतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. घरांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की पुढील आठवड्यात घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.


ठाण्यात 16 ते 44 लाख रुपयांत घर


ठाण्यात 15 ते 44 लाख रुपयांत घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडा सोडतीच्या नोंदणीस आणि पुणे मंडळाच्या 5 हजार 990 घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री आणि स्विकृती अर्ज गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता रखडलेली कोकण मंडळाची सोडत मार्गी लावण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यानुसार अंदाडे चार हजार घरांच्या सोडतीस तसंच घरांच्या किमतीच्या प्रस्तावास म्हाडा उपाध्यक्षांची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.


कुठे असणार आहेत ही घरे?


- 1 हजार 250 घरं पंतप्रधान आवास योजनेतील


- 249 घरं ठाण्याच्या पाचपाखाडीत रेमंड प्रकल्पातील


- अत्यल्प गटासाठ अंदाजे 300 चौ.फु. अंदाजे किंमत 15 लाख 50 हजार


25 घरं सानपाडा येथे असणार आहेत. गुडविल प्रकल्पातील अल्प गटातील घर 350चौ.फुटांचे असणार आहे. या घरांची किंमत 16 ते 18 लाख दरम्यान असण्याचा शक्यता आहे. तर घणसोली 24 घरं अल्प गट असून याची किंमत 24 लाख रुपयांच्या घरात आहे. तर घोडबंदर 59 घरं असून अंदाजीत किंमत 16 लाख असणार आहे. तर खोणी अत्यल्प गटासाठी 60 घरे असून किंमत 17 लाख रुपयांदरम्यान असेल. तर शिरढोण येथे 340 घरं असून 14 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता आहे.


ठाण्यात पत्रकारांसाठी राखीव घरे


ठाणे येथे पत्रकरांसाठी कोकण मंडळाकडून घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही खास राखीव घरे असणार आहे. वर्तकनगर येथे 67 घरं पत्रकारांसाठी राखीव असून घर 350 चौ.फुटांची आहेत. याची किंमत 40 ते 44 लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहे.