Mhada Lottery 2023 : स्वत:च्या घराचं स्वप्न साकार होणार ; अवघ्या 14- 17 लाख रुपयांमध्ये म्हाडाची घरं
Mhada Lottery 2023 : हक्काचं घर हवंय, पण आर्थिक जुळवाजुळव जमत नाहीये? हरकत नाही. म्हाडाची ही सोडत तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आताच पाहा...
Mhada Lottery 2023 : (Dream Home) स्वत:चं हक्काचं घर असावं, कुटुंबातील प्रत्येकाला या घरात स्वत:ची हक्काची जागा मिळावी असं म्हणत प्रत्येकजण अशीच काही स्वप्न रंगवत असतो. अनेकदा (Job News) नोकरी करण्यासाठी हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवला जातो. काहींचं हे स्वप्न साकार होतं. तर, काहींना मात्र या स्वप्नपूर्तीसाठी वाजवीपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागले. हक्काचं घर घेऊ पाहणाऱ्यांसाठी मोलाचं योगदान असतं ते म्हणजे म्हाडा (MHADA) आणि सिडकोच्या (CIDCO) लॉटरीचं. वेतनश्रेणीमध्ये (Salary scale) कर्जाचा बोजा होणार नाही, अशी घरं या मंडळांकडून उपलब्ध करून दिली जातात. ज्यासाठी रितसर सोडत प्रक्रिया पार पडते. सध्या म्हाडाच्या अशाच सोडतीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
कोकण मंडळातील तब्बल 4752 घरांसाठी 11 एप्रिल 2023 ला सोडत निघणार आहे. यासाठी इच्छुकांना 20 फेब्रुवारीपासून घरांसाठी अर्ज घेता येईल. या दिवसापासून अर्जची विक्रीची सुरुवात होणार आहे. NEFT, आरटीजीएसनं अनामत रक्कमेसह (Deposite) अर्ज घरासाठीचा अर्ज 20 मार्चपर्यंत Submit करता येणार आहे. (mhada lottery 2023 sanpada vasai virar thane home latest Marathi news)
कुठे उपलब्ध असतील म्हाडाची घरं?
सोडतीमध्ये 20 टक्के योजना म्हणजेच खासगी बिल्डर्सकडून म्हाडाला मिळालेल्या तब्बल 1554 घरांचा समावेश आहे. म्हाडाच्या या सोडतीमध्ये ठाणे, पाचपाखाडी, वसई, विरार, डायघर, सानपाडा, घणसोली या भागातील घरांचा यात समावेश आहे. यामध्ये अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश असल्याची महिती समोर आली आहे. किमान उत्पन्नापासून या घरांचे दर 30 लाखांपर्यंत असतील.
पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटातील शिरढोण येथे 340, खोणी 60, गोठेघर 256 आणि विरार-बोळिंज येथे असणाऱ्या 328 अशा घरांचाही समावेश आहे. सोडतीतील घरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील 945 घरं, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 129 घरं आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील 2085 घरांचा समावेश असेल. उत्त्पन्नगट नजरेत ठेवत या घरांचे दर साधारण 14,96,930 रुपये, 17,68,658 रुपये, 17,15,164 रुपये आणि 21,15,705 रुपयांच्या घरात आहेत.
हेसुद्धा वाचा : Water Supply : पाणी जपून वापरा! 'या' शहरामध्ये 48 तासांसाठी पाणीपुरवठा बंद
कोकण मंडळाच्या या सोडतीत म्हाडा प्रकल्पातील कमी म्हणजेच फक्त 129 घरांचा समावेश आहे. यामध्ये बाळकुममधील उच्च गटातील 3 घरांचा समावेश असून त्यांचा दर 60 लाखांपेक्षाही जास्त आहे. तर, विरार- बोळिंजमधील अल्प गटातील घरांचा समावेश असून त्यांच्या किमती 28 लाखांपर्यंत आहेत.