Water Supply : पाणी जपून वापरा! 'या' शहरामध्ये 48 तासांसाठी पाणीपुरवठा बंद

Water Supply News : पालिकेनं फ्लो मीटर बसविण्याचं काम हाती घेतल्यामुळं अनेक भागांमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे या भागातील लोकांनी पाणी जपून वापरा आणि दोन दिवसांसाठी पाणीसाठा करुन ठेवा. 

Updated: Feb 16, 2023, 07:51 AM IST
Water Supply : पाणी जपून वापरा! 'या' शहरामध्ये 48 तासांसाठी पाणीपुरवठा बंद title=
Pune Water Supply News off for 48 hours and In which areas will the water supply be shut off in marathi

Pune Water Supply News in marathi : दिवसाची सुरुवात पाण्याचा बातमीने करुयात...आज आणि उद्या पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  महापालिकेकडून समान पाणी योजगेंतर्गत पाण्याचं ऑडिट करण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहेत. त्या कामांसाठी पुण्यात आज 16 फेब्रुवारी आणि उद्या 17 फेब्रुवारीला शहरात काही भागांमध्ये पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे जाणून घ्या कुठल्या भागांचा यात समावेश आहे. (Pune Water Supply News off for 48 hours and In which areas will the water supply be shut off in marathi)

'या' भागात पाणीपुरवठा बंद 

चतुश्रुंगी टाकी परिसर 
बोपोडी
अनगळ पार्क
खडकी
सहारा हॉटेल
राजभवन
पंचवटी
औंध
खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी

अभिमानश्री सोसायटी

एसएनडीटी टाकी परिसर 

शिवाजीनगर
भोसलेनगर
घोले रोड
सेनापती बापट रोड
हनुमाननगर
जनवाडी
वैदुवाडी
मॉडेल कॉलनी
वडारवाडी
रेव्हेन्यू कॉलनी
पोलीस लाइन
गोखलेनगर
भांडारकर रोड

परिसर पद्मावती टाकी परिसर

बिबवेवाडी 
अप्पर व सुपर इंदिरानगर
संभाजीनगर 
काशीनाथ पाटीलनगर
लोअर इंदिरानगर
चिंतामणीनगर
स्टेट बॅंकनगर लेक टाउन
गंगाधाम
बिबवेवाडी
कोंढवा रस्ता
विद्यासागर कॉलनी
सॅलिसबरी पार्क
महर्षीनगर
डायस प्लॉट
मार्केट यार्ड
धनकवडी
गुलाबनगर
चैतन्यनगर
तळजाई वसाहत परिसर

नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र 

 ससाणेनगर
काळे बोराटेनगर
हडपसर गावठाण
 ग्लायडिंग सेंटर
 फुरसुंगी
सय्यदनगर
सातववाडी
इंद्रप्रस्थ
मगरपट्टा
वानवडी
चंदननगर
खराडी
रामटेकडी
माळवाडी
भोसले गार्डन
15 नंबर आकाशवाणी
लक्ष्मी कॉलनी
महादेवनगर
मगरपट्टा परिसर

त्यामुळे महापालिकेकडून पाणी जपून वापरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहेत.