अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिला होता. त्यानंतर आता आमदार रवी राणा यांनी तारीखही जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 22 एप्रिलला मातोश्रीलवर जाऊन हनुमा चालिसा पठण करणार असल्याची घोषणा आमदार रवी राणा यांनी केली आहे. रवी राणा यांच्यासोबत पाचशेहुन अधिक कार्यकर्ते मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती आहे. 


रवी राणा यांचं आवाहन
हनुमान जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करावं, जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा पठण केलं नाही तर आपण मातोश्री बाहेर बसून हनुमान चालिसाचं वाचन करणार असल्याचा इशारा रवी राणा यांनी दिला होता. 


महाराष्ट्राला लागलेलं विघ्न संपविण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसेचं पठण करणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे. 


महाराष्ट्राला लागलेलं विघ्न आणि साडेसाती संपविण्यासाठी मातोश्रीवर जाऊन लवकरच हनुमान चालिसेचं पठण करणार आहे. मातोश्रीवर येण्यासाठी उद्धव ठाकरे मला कोणतंही बंधन ठेवणार नाहीत, ही माझी अपेक्षा आहे,  असंही रवी राणा म्हणाले होते. 


शिवसेनाही आक्रमक
रवी राणा यांच्या आव्हानानंतर शिवसेना देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. धार्मिक तेढ पसरवून दंगल माजवायची आहे का?, असा सवाल महापौर पेडणेकर यांनी रवी राणा यांना विचारला. तर रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.