जळगाव : राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपणार अशी चर्चा होत होती. मात्र, आता सर्वांनाच धक्का देणारी घटना जळगावमध्ये घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे विराजमान झाले आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


जळगाव महापालिकेत खान्देश विकास आघाडीचे नितीन लद्धा यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मनसेचे नगरसेवक ललित कोल्हे यांची जळगाव महापालिकेचे ११ वे महापौर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. केवळ १२ नगरसेवक सोबत असताना त्यांनी महापौरपदापर्यंत मजल मारली. 


सत्ता स्थापनेच्या वेळी खान्देश विकास आघाडीला मनसेने मदत केली होती. खान्देश विकास आघाडीकडून मनसेला एक वर्षासाठी महापौरपद प्रदान करण्यात येईल, असे आश्वासन दिले गेले असल्याचे बोलले जात होते. त्याच आश्वासनाचा भाग म्हणून ललित कोल्हे यांची वर्णी लागली.