सांगली : भिडे गुरुजींच्या गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिडे गुरुजींवरचे आरोप खोटे असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी सांगलीत मोर्चा काढण्यात आला. 'महाराष्ट्र बंद' दरम्यान विनाकारण तोडफोड करण्यात आली. त्याचाही यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.


भिडे गुरुजी कधीही वढू या गावी गेले नसून भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना सूडबुद्धीने या प्रकरणामध्ये गोवले असल्याचा आरोप 'शिवप्रतिष्ठान'चे कार्यवाह नितीन चौगुले यांनी केला आहे. 


मोर्चा काढून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि एसपींना  निवेदन देण्यात आले.  यावेळी संभाजी भिडे गुरुजीही या मोर्चात सहभागी झाले होते. काल जे आंदोलन झालं त्यात जी गाड्यांची तोडफोड करण्यात आली, त्यात जे लोक सामील झाले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, तसंच भिडे गुरुजींच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, संभाजी भिडे यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाय. मात्र भिडे यांनी हिंसाचार झाला त्यावेळी आपण सांगलीत होतो, असं सांगत आपल्यावरील आरोपांचा इन्कार केलाय.