नांदेड : 10 कोटीची खंडणी द्यावी अन्यथा जीवे मारण्यात येईल, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आल्याची माहिती नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै महिन्यात हे पत्र आपणास मिळालं. कुख्यात गँगस्टर रिंदा उर्फ हरविंदरसिंघ संधू याच्या नावे हे पत्र घरी आले. दिल्लीत कितीही सुरक्षा असली तरी तुम्हाला मारू असंही या पत्रात म्हटलंय. औरंगाबाद येथे चिखलीकर थोडक्यात बचावले असा उल्लेखही या पत्रात आहे.


हे पत्र मिळताच त्याची कल्पना पोलीस अधीक्षकांना दिली. मात्र, त्यांना माहिती देऊनही नांदेड जिल्ह्याबाहेर सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीसांनी काहीच केले नाही असा आरोप चिखलीकरानी केला.


जुलै महिन्यात हे पत्र आल्यानंतर आतापर्यंत पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही. त्यामुळे वाट पाहून अखेरीस या गोष्टीला वाचा फोडत असल्याचं नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं.