सातारा : राज्यात महिलांवर अत्याच्याराच्या घटना (Violence against Women) वाढ आहेत, यावर बोलताना खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यात कायदा शिल्लक राहिला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बलात्काराचा गुन्हा करणारे धनधांडगे पैशाच्या जोरावर वकील पोलिस खरेदी करतात, त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चालला आहे .बाहेरच्या देशात कायदे कडक आहेत आपल्याकडे सुध्दा तसे कडक कायदे (Strict laws) करा असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. ;चोरी करणाऱ्यांची बोटं छाटली जातील तर बलात्कार करणाऱ्यांचे काहीही छाटा' असं ही उदयनराजे यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका बाजूला आपण स्त्री म्हणजे आदिशक्ती म्हणतो पण त्यांना जपण्याचं काम तरी आपण केलं पाहिजे असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या 273 व्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला उदयनराजे उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली.


हे ही वाचा : तर आमचाही मनसुख हिरेन झाला असता... क्लीन चीट मिळाल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया


शिवरायांच्या बदनामीचा मुद्दा लावून धरला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीबाबतचा मुद्दा मी लावून धरला नाही तर तो केव्हाच बाजूला पडला असता, उशिरा का होईला आता लोकं एकत्र येत आहे, ही चांगली गोष्ट आहे असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही (Maharashtra-Karnataka Border Dispute) उदयनराजे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. भाषावार रचना होण अपेक्षित होतं, पण झाली नाही .सीमावादावर महाजन समिती बसवली. त्यांना जमलं नाही त्यांची कुवत नव्हती किंवा त्यांची इच्छा शक्ती नव्हती.तुमच्या राजकारणामुळे सीमावर्ती भागातील लोकांची प्रगती खुंटत आहे.या मध्ये पंतप्रधानांनी मध्यस्ती करणे गरजेचे होतं, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.