Pune Crime News: दर्शना पवार प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी, म्हणाले...
MPSC Topper Darshana Pawar: पुणे पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह सापडला. दर्शनाची हत्या नेमकी कशामुळे झाली? याचा तपास सध्या पोलिस (Pune Police) घेत आहेत. अशातच आता या प्रकरणात राजकीय मंडळींनी उडी मारली असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
Darshana Pawar Murder Case : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेला मृतदेह सापडला अन् संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. पोस्टमार्टमधून तिची हत्याच झाल्याचं स्पष्ट झालं असल्याने आता पोलिसांनी (Pune Police) वेगाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दर्शनाच्या वडिलांनी पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये केली होती. त्यानंतर पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला. दर्शनाची हत्या नेमकी कशामुळे झाली? याचा तपास सध्या पोलिस घेत आहेत. अशातच आता या प्रकरणात राजकीय मंडळींनी उडी मारली असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील ट्विट केलंय.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
राजगडावर दर्शना पवार या तरूणीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्याचा तातडीने पोलीसांनी शोध घेतला पाहिजे. तसेच हे प्रकरण फास्टट्रेक कोर्टात चालवावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. जे कोणी आरोपी असतील त्यांची गय करता कामा नये, असंही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar On Darshana Pawar Case) यांनी म्हटलंय.
नेमकं काय झालं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना सत्कार समारंभानिमित्त दर्शना पुण्यात आली होती. त्यानंतर तिने तिचा मित्र राहुल हांडोरे (Rahul Handore) याच्यासह ट्रेकचा प्लॅन आखला. दर्शना राहुलसोबत ट्रेकसाठी सिंहगड आणि राजगडावर गेली होती. मात्र, ट्रेकनंतर दर्शना बेपत्ता असल्याचं आई वडिलांच्या लक्षात आलं. त्यांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. मात्र, तिचा पत्ता लागला नाही. त्यानंतर आई वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवली आणि तपास सुरू झाला.
पोलिसांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासलं तेव्हा लक्षात आलं की दर्शना राहुलसह ट्रेक चढून गेली होती. मात्र, येताना फक्त राहुल सीसीटीव्हीमध्ये दिसला. त्यानंतर राहुलवर संशय व्यक्त केला जात असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणावर सध्या राज्यभर चर्चा होत असून दर्शनाला न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या दर्शना पवार या मुलीचा मृतदेह किल्ले राजगडाच्या पायथ्याला सापडला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापुर्वी हि घटना घडली हे अतिशय खेदजनक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी योग्य दिशेने तपास करुन दर्शनाला न्याय द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलीये.