MPSC परीक्षा पास झालेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यातील किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला; थरारक CCTV फुटेज

राजगडाच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालेय. MPSC उत्तीर्ण तरुणीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आठ दिवसांपासून ही तरुणी बेपत्ता होती .  

Updated: Jun 18, 2023, 09:15 PM IST
MPSC परीक्षा पास झालेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यातील किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला; थरारक CCTV फुटेज  title=

Pune Crime News : पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.  मृत तरुणी नुकतीच MPSC ची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. ही तरुणी बेपत्ता झाली होती. यानंतर आठ दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला आहे. पुणे पोलिल या  प्रकरणी अधित तपास करत आहेत. 

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा हा मृतदेह आढळून आला आहे. दर्शना दत्तू पवार असं मृत तरुणीच नाव आहे. मागील आठ दिवसांपासून दर्शना बेपत्ता होती. नुकतीच ती वन खात्याची आरएफओ ही परीक्षा पास झाली होती. 15 जूनला सिंहगड रोडच्या नऱ्हे पोलीस स्टेशन मध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. आठ दिवसानंतर तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

तरुणीचा खून झाल्याचा संशय

प्रथमिक तपासात दर्शनाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  वेल्हा आणि सिंहगडरोडच्या नऱ्हे पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळलाी होती. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला असून त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. मोठ्या घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
कुटुंबियांनी केली होती बेपत्ता झाल्याची तक्रार

दर्शनाच्या कुटुंबियांनी 15 जूनला सिंहगड रोडच्या नऱ्हे पोलीस स्टेशन मध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.  दर्शना ही सत्कार घेण्यासाठी 9 जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे आली होती. 11 जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती आमच्या संपर्कात होती. मात्र, 12 जूनला दिवसभर आम्ही दर्शनाला फोन करत होतो. मात्र, तिने फोन उचलले नाहीत म्हणून आम्ही स्पॉट लाईट अॅकॅडमी येथे येऊन आम्ही चौकशी साठी आलो. तेव्हा आम्हाला समजले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून त्यांनी सिंहगड रोड पोलिसात मिसिंगची तक्रार दिली. 

वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात तिचा मृतदेह सापडला आहे. साधारण आठ दिवसांपूर्वी हत्या झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सापडलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या असून त्यावरून तरुणीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. संबधित तरुणी ही पुण्यात एमपीएससी करत होती. ती परीक्षा ती पासही झाली होती. मात्र, आठ दिवसानंतर अचानक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वेल्हे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या घटनेने नेमका खून कुठल्या कारणाने झाला याचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.