मुंबई :  गेल्या काही काळापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली, तर काही कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं. कोरोना व्हायरसमुळं उदभवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीचा फटका एसटी महामंडळालाही बसला. अत्यावश्यक सेवा पुरवूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण, आता ऐन सणासुदीच्या दिवसांत मात्र हे चित्र बदलताना दिसणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याचे संकेत दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती देत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून ५५० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आल्याचं परब यांनी सांगितलं. यावेळी मुंबईतून गणेशोत्सवाच्या निमित्तानं गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठीसुद्धा त्यांनी काही अतिशय महत्त्वाच्या घोषणा केल्याचं पाहायला मिळालं. 


कोकणात जाणाऱ्यांसाठीचे काही नियम खालीलप्रमाणं.... 


- जे चाकरमानी कोकणात जातील, त्यांना १२ ऑगस्टपर्यंत अपेक्षित स्थळी पोहचायचं आहे.


- त्यांच्यासाठी १० दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी करण्यात आला आहे. 


- १२ तारखेनंतर जायचं झाल्यास त्यांनी मागील ४८ तासांत कोरोना चाचणी करणं गरजेचं असेल. 


- ग्रुप बुकींग केल्यास एसटी थेट गावात  जाईल. ही एसटी मध्ये कुठंही थांबणार नाही. 


- एसटीनं जाणा-यांसाठी ई पासची गरज नाही


- परंतु इतर वाहनांनी जाणा-यांसाठी ई पासची गरज असणार आहे. 


- खाजगी बस वाल्यांनी एसटी भाड्यापेक्षा दीडपटच भाडे घ्यावे. त्याव्यतिरिक्त पैसे आकारल्याची तक्रार झाल्यास कारवाई केली जाईल


आज सायंकाळपासून सुरु होणार बुकींग 


- आज (४ ऑगस्ट २०२०) ६ वाजल्यापासून महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बुकींग सुरु होणार आहे. 
 केले जाईल


- ३ हजार एसटी गाड्या कोकणासाठी ठेवल्या आहेत



- इतर पक्षांना स्वेच्छेने गाड्या पाठवायच्या असतील त्यांनी पाठवाव्यात, असंही परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं.