औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) काम युद्धपातळीवर सुरु आहे.  १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग (Mumbai-Nagpur Samruddhi Highway) सुरु होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केली. त्यांनी अमरावतीमध्ये बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ही घोषणा केली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. चांगल्या दर्जाचे काम होत असल्याची पावती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. येत्या १ मे २०२१ पर्यंत नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरु होणार आहे. तर १ मे २०२२ पर्यंत मुंबईपर्यंत महामार्ग सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर  उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले. 



समृद्धी महामार्ग मुख्यतः १२ जिल्ह्यातून जातो. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या महामार्गाचे नाव स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे करण्यात आले. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. 



समृद्धी महामार्गचा काही टप्पा येत्या एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याची चाचपणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी ही पाहणी घेत कामाचा आढावा घेतला.