Most expensive expressway In India : भारतातील सर्वात महागडा एक्स्प्रेस वे आपल्या महाराष्ट्रात आहे. देशातील सर्वात महागडा टोलनाका देखील आपल्या महाराष्ट्रातच आहे. हा टोलनाका महाराष्ट्राची धनलक्ष्मी म्हणून ओळखला जातो. हा भारततील सर्वाधिक कमाई करणारा टोलनाका आहे. या महामर्गावर वसुल केला जाणारा टोल तर विचारूच नका. जाणून घेऊया हा महामार्ग कोणता आहे.


हे देखील वाचा... दादरमध्ये फुटपाथवर भाजी विकणाऱ्याने Torres Company मध्ये गुंतवले 4,00,00,000! एवढा पैसा कुठून आणला? धक्कादायक खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात असलेला भारतातील सर्वात महागडा महामार्ग म्हणजे  मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आहे (Mumbai-Pune Expressway. देशातील सर्वात जुना आणि महागडा द्रुतगती मार्ग आहे. तसेच हा  हा देशातील पहिला 6 लेन असलेला सर्वात मोठा महामार्ग देखील आहे. 


देशाची अर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर आणि पुणे शहराला जोडण्यासाठी हा महामार्ग बांधण्यात आला. या महामार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन महत्वपूर्ण शहरातील अंतर कमी होऊन प्रवास जलद  झाला आहे. या महामार्गामुळेच महाराष्ट्राची तिजोरीत नेहमीच भरलेली असते. 


2002 साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात या महामार्गाची पायाभरणी करण्यात आली. मात्र,  2000 मध्येच हा एक्स्प्रेसवे प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.  94.5 किलोमीटर लांबीचा हा मुंबई पुणे एक्स्प्रेस वे उभारण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागली.  1,63,000 कोटी रुपये खर्च करुन  मुंबई पुणे एक्स्प्रेस उभारण्यात आला.


देशातील सर्वात महाग टोल याच महामार्गावर वसुल केला जातो.  मुंबई पुणे एक्स्प्रेस वर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना एका मार्गासाठी 320 रुपये टोल भरावा लागतो. टेम्पोसाठी एकेरी टोल टॅक्स 495 रुपये आहे. बससाठी 940 रुपये इतका टोल दर  आहे. डबल एक्सल ट्रकसाठी 685 रुपये, तीन एक्सल ट्रकसाठी 1,630 रुपये आहे. तर मल्टी एक्सल ट्रकसाठी 2165 रुपये टोल आकारला जातो. 


मोठ्या रकमेचा टोल वसुल केला जात असला तरी लाखो प्रवासी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरुनच प्रवास करतात. कारण यामुळे वेळेची बचत होते. या महामार्गामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त साडे तीन तासांत पूर्ण होतो. नवी मुंबईतील कळंबोली येथून हा एक्सप्रेस वे सुरु होतो. पुण्यातील किवळे येथे हा महामार्ग संपतो. या महार्गावर प्रवास करताना अद्भूत निसर्ग सौंदर्य पहायला मिळते.