ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परतताना वाटेतच मृत्यने गाठलं; दोघा भावांचा एकावेळी मृत्यू
ईद सण साजरा होत असतानाच दोघा भवांसाह भयानक घटना घडली आहे. ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परत येत असताना वाटेतच यांचा मृत्यू झाला आहे.
Nalasopara Crime News : सर्वत्र बकरी ईद (bakari id) मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अशातच नालासोपारा येथे एक अत्यंत भयानक घटना घडली आहे. दोघा भावांचा एकावेळी मृत्यू झाला आहे. ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परत येत असताना वाटेतच यांना मृत्यने गाठलं आहे. ईदच्या सणाच्या दिवशी दोघा भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अमन शेख (वय 19) आणि अदनान शेख (वय 23 वर्षे) अशी मृत भावांची नावे आहेत. नालासोपारा येथे राहणाऱ्या या दोघा भावांचा ईदच्या दिवशीचं विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. नालासोपारा पूर्वेला असलेल्या तुळींज स्मशानभूमीजवळील अप्पा नगर मध्ये गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हे दोन मावस भाऊ बकरी ईद निमित्ताने कुर्बानी देऊन घरी परत येत होते. यावेळी तुळीज स्मशानभुमीजवळ येथे असलेल्या विहिरीत पोहण्यासाठी ते उतरले होते. मात्र, विहिर खोल असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. ही बातमी परिसरात समजताच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
या घटनेची माहिती वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले आणि बुडालेल्या दोघांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.
पुलावरून वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह 24 तासानंतर सापडला
अरततोंडी-पिंपळगाव दरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावरून एक अनोळखी इसम सायकलसह वाहून गेल्याची घटना बुधवारी घडली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शोध व बचाव कार्य सुरू होते. अखेर 24 तासानंतर इसमाचा मृतदेह सापडला आहे. अरविंद ठाकरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्ती गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा येथील रहीवासी आहे.
गुन्हेगाराचा समुद्रात बुडून मृत्यू
रायगड जिल्ह्यातील मुरुड इथल्या काशिदजवळ एका गुन्हेगाराचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. मोहम्मद गनी असं या आरोपीचं नावं असून, त्याच्यावर खुनाचा खटला सुरू होता. गुरुवारी अलीबाग येथील न्यायालयाच्या कामकाजानंतर तो मित्रांसोबत समुद्रकिनारी गेला. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो समुद्रात बुडाला. स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.