Maharashtra Weather Updates : राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय झाला खरा, मात्र अजूनही अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. राज्यात 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला आहे. मात्र, मुंबईसह ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग करत आहे. ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. ठाणे परिसरात गेल्या 24 तासांत 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबई - गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे. तर शहापूर तालुक्यातील खर्डी इथल्या काष्टी आणि वैतागवाडी गावांचा पर्यायी रस्ता वाहून गेला आहे.


मुंबई - गोवा महामार्गावर निवळी ते हातखंबा रस्ता खचला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, याआधी मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, येथे जोरदार पाऊस झाला तर दरड खाली येण्याची भीती कायम आहे. आज पहिल्याच पावसाने निवळी ते हातखंबा दरम्यान महामार्गाचा भाग खचला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक संथ सुरु आहे. पहिल्याच पावसात शहापूर तालुक्यातील खर्डी इथल्या काष्टी आणि वैतागवाडी गावांचा पर्यायी रस्ता वाहून गेलाय.. या गावात समृद्धी महामार्गाचं काम सुरु आहे. त्यामुळे गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ता बांधण्यात आलाय.. मात्र पावसानं या रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य आहे.. त्यात काल झालेल्या पावसात रस्त्याचा एक भाग वाहून गेल्यानं गावकरी तसेच विद्यार्थ्यांना जेसीबीतून रस्ता ओलांडावा लागत आहे.


मुंबईत आतापर्यंत तिघांचा मृत्यू, पावसाची जोरदार बॅटिंग


मुंबई आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरुय. त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढतंय. त्यामुळे मुंबईकरांची पाणीकपात टळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. झाड पडून तिघांचा मृत्यू झाला. भायखळा येथे 22 वर्षीय तरुणी तर मालाडमध्ये 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.


ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग केली आहे. अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालाय. राज्यात 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसलाय. जून महिना संपत आलाय तरी देखील म्हणावा तसा पाऊस बरसत नसल्यामुळे बळीराजाची चिंता वाढलीय. पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न उपस्थित झालाय. अनेक ठिकाणी पाणीकपातीची टांगती तलवार आहे. 


ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे. ठाणे परिसरात गेल्या 24 तासांत 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर  बदलापुरात 24 तासांत 273 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, ठाण्यात शहरात आज पावसाचा जोर कमी आहे.  पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुय. सूर्या आणि वैतरणा नद्या दुथडी भरुन वाहतायत. जिल्ह्याच्या काही भागात आजही मुसळधार तर काही भागात पावसाची संततधार कायम आहे. पालघरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.