Mumbaicha dabewala On Maharastra Politics : मराठी मतांची एकजुटी ठेवायची असेल तर राज आणि उद्धव या दोघांनी एकत्र आलंच पाहीजे, ही काळाची गरज आहे, असं मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर (Subhash Talekar) यांनी म्हटलं आहे. सक्रिय राजकारण हा मराठी माणसांचा प्रांत आहे. तरीही मुंबईत आपण भलं आणि आपलं काम भलं, असं मानून तो मुंबईत आपली संस्कृती टिकवून ठेवत आला आहे. पण काही पक्ष मुंबईतील मराठी माणसांचा टक्का घसरावा. त्यांची संस्कृती लयास जावी यासाठी खास प्रयत्न करत आहेत, असं सुभाष तळेकर म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत वाघांची संख्या कमी होऊन सिंहाची संख्या वाढणार आहे. वाघ म्हणजे मराठी माणुस याची संख्या कमी होणार आणि सिंह म्हणजे परप्रांतीय त्यांची संख्या वाढणार आहे. आधीच मुंबईत २४ टक्के मराठी माणूस शिल्लक राहीला आहे. तो कसा कमी होईल याकडे सतत त्यांचा कल राहिला आहे. मग यातुनच मराठी माणसाला नवीन ईमारतीत घर घेण्यास मनाई करण्यात आली. त्याला नाव दिलं मराठी माणूस.. मास मच्छी खातो म्हणून त्याला घर नाकारलं. या मराठी माणसांच्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाला घर नाकारतात, आणि नाकारणारे कोण? तर परप्रांतीय... आता मराठी माणसांने काय खावे आणी काय प्यावं हे ही परप्रांतीय ठरवणार की काय? असा सवाल सुभाष तळेकर यांनी विचारलाय.


अशा वेळी मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि याचा मुकाबला केला पाहिजे. शिवसेना आणी मनसे हे दोन्ही पक्ष आप-आपल्यापरीने  मराठी माणसाच्या न्याय हक्कीसाठी सतत भांडत आहेत. पण यांची ताकद विखुरली गेली असल्याने त्यांचे योग्य ते लोकप्रतिनिधी संबधीत संस्थेत निवडणुकीत निवडून जात नाही ही वस्तुस्थिती आहे. तसेच शिवसेनेमधील मोठी बंडखोरी पहाता शिवसेनेत मोठी पडझड झाली आहे.  ही स्थिती बदलायची असेल आणि मराठी विरोधकांना रोखायचं असेल तर शिवसेना आणी मनसे एकत्र आले पाहिजे. एकत्रित पुणे-मुंबई महानगरपालिकेसह सर्व निवडणुकीला सामोरे गेले पाहीजे. म्हणजे मराठी माणसांची मतं फुटणार नाहीत. पर्यायाने मराठी लोकप्रतीनिधी जास्त निवडून येतील. महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांना मराठी मतांची आवशक्ता पहाता त्यांचे नेते मनसे नेत्यांच्या जास्त संपर्कात येत आहे त्यांच्या युतीच्या बातम्या पेपर मध्ये येत आहेत.


आणखी वाचा - "शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!


दरम्यान, मराठी माणसांची मते मनसेच्या माध्यमातून आपल्याला मिळाली तर त्याचा लाभ आपल्याला अधिक होऊ शकतो. हा त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे आणि मनसे प्रमुख राजजी ठाकरे यांनी एकत्र घ्यावं व महानगरपालिके सोबत सर्व निवडणुका एकत्र येऊन लढवाव्या आणि त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवावा. राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात तसे मराठी मानसांच्या भल्यासाठी त्यांनी एकत्र आले पाहीजे अशी प्रत्येक मराठी माणसांच्या मनामधील ही भावना आहे. पण सरते शेवटी या दोघा भावांनीच काय तो निर्णय घ्यावयाचा आहे, अशी भावना मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे.