मुंब्रा बायपास कामासाठी २ महिने टोल बंद
ठाण्यातील आनंदनगर टोलनाका बंद करण्यात आलाय.
मुलुंड : मुलुंड टोलनाक्यावर राष्ट्रवदीचे आंदोलन सुरु झालंय. त्यामुळे ठाण्यातील आनंदनगर टोलनाका बंद करण्यात आलाय. मुंब्रा बायपासचे काम सुरु असेपर्यंत टोल बंद करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. मुंब्रा बायपास काम सुरू असेपर्यंत टोल बंद ठेवा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. आता टोलचे अधिकारी आणि सरकार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.