मुंबई : Rajan Salvi on Maharashtra Vidhan Sabha President Election : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर राजन साळवी यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.  शिवसेनेच्या व्हीपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे शिवसेना नेते राजन साळवी म्हणाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीतर्फे विधानसभा अध्यक्षपदासाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मला विश्वास आहे की महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व आमदार मला मतदान करतील आणि विजय आमचाच होईल.  शिवसेनेच्या व्हीपनुसार जर बंडखोर आमदारांनी मला मतदान केलं नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असे राजन साळवी म्हणाले.


हा शिवसेना अंतर्गत प्रश्न - सुनील प्रभू



विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी  महाविकास आघाडी प्रत्येकजण व्हीप काढेल. विधीमंडळ नियमावली नुसार व्हीप काढला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी दिली. 


एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवणं बेकायदेशीर आहे. याबाबत आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असा दीपक केसरकर यांनी इशारा दिला होता. याला सुनील 
प्रभू यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर केसरकर यांनी बोलायची गरज नाही. 


शिवसेनेकडून अध्यक्षपद निवडणुकीसाठी राजन साळवींनी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपकडून राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात लढत होणार हे नक्की झाले आहे. राजन साळवी यांचा अर्ज भरताना अशोक चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.