पुण्यातल्या भवानी पेठेतील विशाल सोसायटीत झालेल्या स्फोटाचं गूढ वाढलं
फ्लॅटमध्ये काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
पुणे : पुण्यातल्या भवानी पेठेतील विशाल सोसायटीत झालेल्या स्फोटाचं गूढ वाढलं आहे. या सोसायटीतल्या ज्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला त्यातल्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच फ्लॅटमध्ये काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
बॉम्ब डिटेक्शन पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर राशिद शेख या इसमाला ताब्यात घेण्यात आलं. तो मुळचा मुंबईतला असून 10 वर्षांपासून इमारतीत वास्तव्याला आहे.
दरम्यान, पोलिसांनी सकृतदर्शनी हा घातपाताचा प्रकार दिसत नसल्याचं म्हटलं आहे.
पुण्यातील भवानी पेठ येथील विशाल सोसायटी येथे दुपारी 3 वाजता राशिद शेख यांच्या विशाल अपार्टमेंट येथील बी विंग मधील 3 ऱ्या मजल्यावरील 306 फ्लॅट मध्ये हा स्फोट झाला. या स्फोटमध्ये त्या फ्लॅट मधील सर्व काचा फुटल्या.