मुंबई : भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याआधी खडसे यांनी दिल्लीमध्ये शरद पवारांची भेट घेतली होती. आजची ही भेट अज्ञातस्थळावर झाली असून या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचे समोर येत आहे. गेले दोन दिवस खडसे आणि पवार नागपुरात आहेत. पण ही भेट होणार नाही असे सांगण्यात येत होते. काल खडसे जेव्हा विधानभवनात आले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत अज्ञातस्थळी त्यांची भेट झाली हे निश्चित आहे. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते देखील खडसेंच्या स्वागतासाठी इच्छुक आहेत. पण आपण पक्ष सोडणार नसल्याचे एका बाजुला खडसे सांगत असताना पवारांच्या वारंवार भेटी घेत आहेत. यामध्ये काहीतरी गौडबंगाल नक्कीच असल्याचे स्पष्ट होत आहे. 


नाराज एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यातूनच एकनाथ खडसे शरद पवारांची भेट घेण्याची चर्चा आहे. त्यामुळे आता खडसे भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? अशी देखील चर्चा आहे. 



45 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये सक्रीय असलेले एकनाथ खडसे गेल्या काही काळापासून भाजपवर नाराज आहेत. एकनाथ खडसेंना पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे नाराज एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार का? अशी चर्चा आहे. ही चर्चा रंगली असताना,'खडसे भाजपवर नाराज आहेत; पण त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय अद्याप झाला नसल्याची, माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिली. 


एकनाथ खडसे नागपूरमध्ये पोहोचले आहेत. खडसेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवत आहेत.