नागपूर : भाजपच्या महापौर नंदा जिचकार यांनी स्वतःच्या मुलाला पीए म्हणून अमेरिकेला नेल्याने नवा वाद सुरू झालाय. याप्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन खुलासा करण्याची वेळ महापौर जिचकार यांच्यावर आली. यावेळी भाजपचे नागपूरमधील नेतेही सोबत उपस्थित होते. 


सॅनफ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या परिषदेसाठी महापौर जिचकार आपल्या मुलाला पीए म्हणून घेऊन गेल्या. दरम्यान, मुलाला सोबत घेऊन येतेय, याची स्पष्ट कल्पना आयोजकांना दिली होती. यात मी कसलीही बनवाबनवी केलेली नाही, असं स्पष्टीकरण महापौर जिचकार यांनी दिलंय.