Samruddhi Mahamarg : राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि नव्यानं सुरु झालेला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी काही तास बंद राहार आहे. महामार्गावरील दोन्ही बाजूंनी सुरु असणारी वाहतूक पाच दिवसांसाठी काही तास बंद असेल. त्यामुळं या वाटेवरून प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार असून, प्रवाशांना आता पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अतिउच्चदाब वाहिनी टॉवरचं काम हाती घेण्यात आल्यामुळं महामार्ग बंद राहील. 


कोणकोणत्या दिवशी कोणत्या वेळी बंद असेल महामार्ग? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान जालना ते छत्रपची संभानगरदरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक दुपारी 12 ते 3.30 वाजेपर्यंत; बुधवारी 25 ऑक्टोबर ते गुरुवार 26 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 3 या दिवशी आणि निर्धारित वेळेत महामार्ग प्रवासासाठी बंद राहील. 


महामार्गावर हाती घेण्यात येणारं काम दोन टप्प्यांमध्ये पार पडणार असून, पहिला टप्पा 10 ते 12 ऑक्टोबर आणि दुसरा टप्पा 25 ते 26 ऑक्टोबरदरम्यान पार पडणार आहे. 


हेसुद्धा वाचा : दिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण 


पर्यायी मार्ग म्हणून कोणत्या वाटेनं जावं? 


समृद्धी महामार्गावरील शिर्डीहून नागपूरच्या दिशेनं जाणारी वाहतूक सावंगी इंटरचेंज क्र. आयसी 16 छत्रपती संभाजीनगरहून बाहेर पडून विरुद्ध दिशेने निधोना जालना समृद्धी महामार्गावर प्रवेश करून नागपूरमध्ये येईल. 
नागपूरहून मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक जालना इंटरचेंज- निधोना एमआयडीसी- जालना महामार्गावरून  छत्रपती संभाजीनगर- केंब्रिज शाळेहून उजवीकडे वळून सावंगी बायपास, सावंगी इंटरचेंजमार्गे शिर्डीच्या दिशेनं पुढे जाईल.