नागपूर : नागपूरमधील व्यावसायिक राहुल आगरेकर अपहरण आणि हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हत्येप्रकरणी पंकज हारोडे याला पोलिसांनी हावडा येथून अटक केली आहे. राहुल आगरेकर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या तरूणाची हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता. १ कोटी रूपयांसाठी राहुलची हत्या करण्यात आल्याचं समजतंय.


मृतदेह जाळला


राहुल आगरेकर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या तरूणाची हत्या करून मृतदेह जाळण्यात आला होता. १ कोटी रूपयांसाठी राहुलची हत्या करण्यात आल्याचं समजतंय.


१ कोटी रूपयांसाठी हत्या


लॉटरी व्यावसायिक असलेला राहुल आगरेकर मंगळवारी सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील घरातून निघाला होता. त्यानंतर परत आलाच नाही. दुपारी राहुलचा भाऊ जयेशला फोनवरून आरोपीनं १ कोटीच्या खंडणीची मागणी केली. नागपूरमधील बुटीबोरी शिवराजवळ पोलिसांना जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता.