स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी आंदोलनातून रात्रीच उचलले
Ravikant Tupkar was arrested : शेतकरी (Farmers) प्रश्नाबाबत आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले.
नागपूर : Ravikant Tupkar was arrested : शेतकरी (Farmers) प्रश्नाबाबत आवाज उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले. तुपकर यांनी संविधान चौकात बुधवारी सकाळी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. मात्र, त्यांना आंदोलन ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतले. (Swabhimani Shetkari Sanghatana leader Ravikant Tupkar was arrested by the police during the agitation)
'स्वाभिमानी'च्या रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरु केला होता. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी तुपकर यांनी काल सकाळपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला होता. मात्र, 144 कलम आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी त्यांना आंदोलनातून रात्रीच उचलले.
दरम्यान, पोलीस कस्टडीतही तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरुच ठेवले आहे. तसे त्यांनी केले स्पष्ट आहे. तुपकर यांना घेऊन पोलीस बुलडाणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. तुपकर यांना अटक करण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नागपूर शहरात संचारबंदीमुळे आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मग कर्फ्यू आदेश लागू असताना तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.