Job News : तरूणांसाठी नोकरीची संधी... `या` ठिकाणी आहेत अनेक रिक्त पदं
गपूरात होणार्या हिवाळी अधिवेशनासाठी (Nagpur Winter Session) लिपिक, टंकलेखक, शिपाई व संदेशवाहकांची हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर: सध्या अनेक ठिकाणी नोकऱ्यांची (recruitment news) संधी तरूणांसाठी उपलब्ध झाली आहेत. अनेकांना हल्ली अनेक क्षेत्रात मोठ्या संधी या उपलब्ध आहेत. सध्या अशाच काही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. सध्या नागपूरात हिवाळी अधिवेधनाच्या निमित्ताने तरूणांसाठी काही तात्पुरती पदे भरण्यात येणार आहेत. नागपूरात होणार्या हिवाळी अधिवेशनासाठी (Nagpur Winter Session) लिपिक, टंकलेखक, शिपाई व संदेशवाहकांची हंगामी स्वरूपात पदे भरण्यात येणार आहेत. लिपिक-टंकलेखकांची एकूण 10 पदे आणि शिपाई व संदेश वाहकांची एकूण 24 पदे भरण्यात येणार आहे. 4 ते 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्ज सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्रमांक 2, दुसरा माळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे स्वीकारण्यात येतील. (nagpur winter session temprorary recruitment for yongsters including peon typist news)
लिपीक-टंकलेखक या पदाकरिता शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असावी. त्यातही मराठी टंकलेखनासाठी 30 वर्ड पर मिनिट (मिनिटाला 30 शब्द) तर इंग्रजी टंकेलखनासाठी 40 वर्ड पर मिनिट असे कौशल्य असणे आवश्यक आहे. टंकलेखनासाठी शैक्षणिक पात्रतेसोबतच एमएससीआयटी किंवा इतर संगणकशी संबंधित कोर्स केले असावेत.
हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....
या पदासाठी 18 ते 38 वयवर्षे असणं महत्त्वाचं आहे. मागास वर्गीयांसाठी ते 18 ते 43 वर्षातील वयोगटासाठी शिपाई संदेश वाहक अशी पदे आहेत. ज्यांची शैक्षणिक पात्रता चौथी वर्ग उत्तीर्ण अशी आहे. वरील वयोगटातील लोकांना सायकल चालवता येणे आवश्यक आहे.
कसा कराल अर्ज?
हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
दिलेल्या वेळेनंतर जर काही अर्ज आले तर ते स्विकारले जाणार नाहीत. अर्ज सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्र.2, 2रा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर 44000 येथे स्वीकारण्यात येतील. इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात अर्जाचा नमुना घेण्यासाठी येताना सोबत फोटो तसेच इतर शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. (nagpur winter session temprorary recruitment for yongsters including peon typist news)