नागपूर : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. खरं तर हा भाजपला  भाजपला नागपूरमध्ये अवघ्या १५ जागा मिळाल्यात. तर तब्बल ३० जागा मिळवत काँग्रेसने मुसंडी मारलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला असून भाजपला जोरदार धक्का दिलाय. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात आघाडीवर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना हा मोठा धक्का मानला जातोय. 


माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.