नांदेड : उडाण योजनेअंतर्गत नांदेड-अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव-मुंबई आणि नाशिक-मुंबई विमान सेवेचा उदघाटन सोहळा पार पडला. मात्र प्रवाशांना आठवडाभर करावी लागणार प्रतीक्षा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड-हैद्राबाद, नांदेड-मुंबईनंतर आता नांदेडहून नांदेड - अमृतसर ही विमानसेवा सुरु झाली. काल अमृतसरहून 170 प्रवासी घेऊन एअर इंडीयाचे विमान नांदेड विमानतळावर दाखल झाले..त्यांनंतर नांदेडहून 52 प्रवासी घेउन या विमानाने अमृतसरकडे भरारी घेतली.


आठवडयातून दोन दिवस ही सेवा सुरु राहणार आहे. नांदेडमध्ये शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच समाधीस्थळ आहे. नांदेडच्या तख्त संचखंड गुरुद्वाराला दर्शानासाठी देश विदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यात पंजाब आणि हरियाणाहून येणा-या भाविकांची संख्या अधिक आहे..



मात्र या भविकांना दोन दिवसांचा प्रवास करुन रेल्वेने यावं लागत होतं..  नांदेड - अमृतसर ही विमानसेवा सुरु करण्याची शिख समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.  केंद्राच्या उड्डान योजनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा महिंन्यापूर्वी या सेवेची घोषणा केली होती.