Ajit Pawar, Maharastra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादीतील विसंवादानंतर आता अजितदादांनी भाकरी फिरवली (Ajit Pawar Maharashtra Political Crisis). त्यामुळे आता शरद पवार यांच्या पाठिंब्याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांना समर्थन देणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.


काय म्हणाले नारायण राणे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांच्‍या गुगलीवर सिक्‍सर! देवेंद्र फडणवीस यांच्‍या यॉर्करवर राष्‍ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उध्‍दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्‍वत:च्‍या पायात अडकून पडून रन आऊट. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे.


कोणत्या नेत्यांनी घेतली शपथ


अजित पवार (उपमुख्यमंत्री) , छगन भुजबळ , दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे , धर्मा आत्रम, आदिती सुनील तटकरे , संजय बाबुराव बनसोडे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, तो ऑपरेशन लोटसचा भाग होता. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रवक्ता महेश तपासे यांनी दिली आहे.