दिनेश दुखंडे/सागर कुलकर्णी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा राजकीय भवितव्य ठरवण्यासाठीचा दस-याचा मुहुर्त टळणार असल्याचं स्पष्ट झालंय. राणे आता १ ऑक्टोबरला आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र राणेंची मंत्रीमंडळात निश्चितपणे वर्णी लागणार आहे. मात्र भाजपात प्रवेश करून की स्वतंत्र पक्ष स्थापन करून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री सध्या परदेश दौ-यावर आहेत. ते २९ सप्टेंबरला महाराष्ट्रात परतणार आहेत. त्यामुळं राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हाती आहेत. दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी राणे-शाह भेटीत भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपलं विधान फिरवलंय. नारायण राणे आणि अमित शाह यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली, त्याला मूर्त स्वरूप आल्यानंतर त्याबाबत माहिती दिली जाईल, असं आता ते सांगतायत. 


पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक झाली. त्या नंतर ते बोलत होते. आम्ही निवडणुका जिंकत असल्यानं जनता पाठीशी असल्याचं स्पष्ट होतंय, असा दावा दानवेंनी यावेळी केला. मात्र राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत दानवेंनी आपलं विधान खोडून काढल्यामुळे राजकीय संभ्रम वाढवला आहे.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि नारायण राणे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. शाह यांनी राणेंना दोन्ही बाजू समजावून सांगितल्यात. त्यामुळे पुढचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार राणेंचा असून ते दस-याला आपला निर्णय घेतील असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.