Nashik Crime: नाशिकमध्ये एका बावीस वर्षीय भाजी विक्रेत्या युवकाचा सहा युवकांनी अवघ्या 12 सेकंदात 27 वार करत थरारक पद्धतीने खून केल्याची घटना समोर आली होती. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर गुन्हेगार इंस्टावर लाईव्ह येतात. यातून पुढे आणखी गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भाईगिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्स बनवणे आता महागात पडणार आहे. कुठल्याही सोशल मीडियावर अपलोड करताना दादागिरी भाईगिरी तसेच आव्हान, प्रती आव्हानांची भाषा असेल तर अशा डायलॉगबाजी वा प्रदर्शन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. 


यासाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर  नाशिकचे सायबर सेल विशेष लक्ष देणार आहे. भाईगिरीच्या पोस्टला लाईक करणारे, कमेंट  करणारे तसेच अशा भाईना फॉलो करणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे.


तुम्ही 'असे' पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त


आपल्याकडे सोशल मीडिया लॅब कार्यरत आहे. त्यात प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टची माहिती आपल्याकडे येते. काहीजण त्यावर भडकाऊ आणि चिथावणीखोर कमेंट करतात. त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती डीएसपी किरण चव्हाण यांनी दिली. 


तुमच्या नजरेत अशी पोस्ट दिसल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी. सायबर सेल त्यावर कार्यवाही करेल. पण त्या पोस्टवर वादग्रस्त कमेंट करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, असे डिसीपींनी सांगितले. 


इंस्टाग्रामवर बदनामी 


नाशिकच्या शिवाजी चौक घटनेतील मारेकरी असलेल्या ओम पवार उर्फ ओम्या खटकी या युवकाला मारहाणी झाली होती. नवीन नाशिक परिसरातील पाथर्डी फाटा परिसरात त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणाचा राग ओम पवार उर्फ ओम्या खटकी या युवकाच्या डोक्यात होता. आपली सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी झाली हा राग मनात धरून टप्प्यात येताच संदीपचा बदला घ्यायचा असे त्याने ठरवले होते.


'दान द्या' म्हणत घरात घुसले, सासू सुनेला बेशुद्ध केले आणि..नागपुरात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार