तुम्ही 'असे' पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त

Pune Fake Paneer Seized: तुम्ही घरी खाण्यासाठी जे पनीर मागवता ते कुठून आणता? ते पनीर खाण्यायोग्य असेल का? याचा कधी विचार केलाय का? कारण पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक दोन किलो नव्हे ते तब्बल 4 हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 29, 2023, 12:56 PM IST
तुम्ही 'असे' पनीर तर खात नाही ना? कर्नाटकातून आलेले 4 हजार किलो बनावट पनीर जप्त title=

Fake Paneer Seized: तुम्ही घरी खाण्यासाठी जे पनीर मागवता ते कुठून आणता? ते पनीर खाण्यायोग्य असेल का? याचा कधी विचार केलाय का? कारण पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एक दोन किलो नव्हे ते तब्बल 4 हजार किलो पनीर जप्त करण्यात आले आहे.

5 जुलै रोजी कर्नाटक येथून एक टेम्पो बनावट पनीर घेऊन पुण्यात येत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक 1 ला मिळाली. या टेम्पोला कात्रज चौकात गाठायचा निर्णय घेण्यात आला. नियोजन ठरले. त्यानुसार दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी, अन्न-प्रशासन विभागातील कर्मचारी सज्ज झाले. त्यांनी कात्रज चौकात सापळा रचला आणि मोठ्या शिताफिने टेम्पो ताब्यात घेतला. 

यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी पंचासह टेम्पोची पाहणी केली. यामध्ये त्यांना टेम्पोत तब्बल 4 हजार 970 किलोग्रॅम सुट्टे पनीर आढळले. हे पनीर पुण्यातील विविध भागांमध्ये पोहोचवले जाणार होते. त्याआधीच ही कारवाई करण्यात आली.

'दान द्या' म्हणत घरात घुसले, सासू सुनेला बेशुद्ध केले आणि..नागपुरात दिवसाढवळ्या धक्कादायक प्रकार

यानंतर पनीरचे सॅम्पल तपासणीसाठी नॅशनल ऍग्रीकल्चर अँड फूड अनॅलिसिस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट बाणेर येथे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

या कारवाईत दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक 1 ने कर्नाटक येथून पुण्यात आणले जाणारे 10 लाख किमतीचे 4 हजार 970 किलोग्रॅम बनावट पनीर जप्त केलं आहे.

केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

यातील काही पाकिटामधील पनीर हे भेसळ असल्याचा अहवाल प्राप्त झाला त्यानुसार हे पनीर नष्ट करण्यात येणार आहे.

ही कारवाई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील यांनी केली.