योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर (Nashi Road Railway Station) 19 वर्षाच्या विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार (physically assault) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. गुजरात मधील नवसारी येथून ही विवाहिता आपल्या बहिणीकडे आली होती. रेल्वेने मध्यरात्री ती रेल्वे स्थानकावरच थांबली होती. सकाळ झाल्यावर घरी जाण्यासाठी बस मिळतील म्हणून तिने रेल्वे स्थानकावर थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचवेळी मदतीच्या बहाण्याने विवाहितेला अज्ञात स्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर या दोघांना नाशिक रोड पोलिसांनी (Nashik Police) अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवसारी येथून नाशिकमधील (Nashik News) आपल्या बहिणीकडे ही विवाहिता आली होती. पण मध्यरात्र झाल्याने ती रेल्वेस्थानकावरच थांबली होती. त्याचवेळी दोघांनी मदतीच्या बहाण्याने तिला चेहडी शिव परिसरात तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर विवाहितेला मारहाण देखील करण्यात आली होती. त्यानंतर विवाहितीने तिथून पळ काढत पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एकजण रेल्वे स्थानकावरील पाणी विकण्याचे काम करतो तर दुसरा रिक्षाचालक आहे.


नेमकं काय घडलं?


बुधवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पीडित विवाहिता नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरली होती. त्यानंतर तिने एका प्रवाशाच्या मोबाईलवरुन बहिणीला फोन केला. मात्र बराच उशीर झाल्याने बहिणीने रेल्वे स्थानकावर थांबण्यास सांगितले. त्याचवेळी रेल्वे स्थानकावरील पाणी विक्रेता कुणाल पवार याने मदतीचा बहाणा करत तिची विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुणाल पवारने त्याचा मित्र रिक्षा चालक मित्र प्रकाश मुंडे याला बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी तिला चेहडी शिव परिसरात नेले. त्यानंतर तिथल्या एका पेरूच्या बागेत नेऊन विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिला मारहाण करत कोणाला काही सांगितलं तर मारून टाकू अशी धमकी दिली. त्यावेळी विवाहितीने तिथून पळ काढला. त्यावेळी शेजारच्या इमारतीमधल्या एका सुरक्षारक्षकाने विवाहितेला पाहिलं आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.


दरम्यान,  पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची नोंद करत गुरुवारी संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक केली आहे. दुसरीकडे हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.