मोबाईल, टीव्ही नव्हे..थेट थिएटरमध्ये पाहता येणार लोकसभेचा लाईव्ह निकाल; कुठे सुरुय बुकींग? जाणून घ्या
Nashik Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates : छोट्या स्क्रीनवर निकाल न बघता मोठ्या स्क्रीनवर हा निकाल पाहता येणार आहे.
Nashik Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल उद्या जाहीर होईल. राज्यात महाविकास आघाडी की महायुती? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळणार आहे. लोकसभा मतदानाचा अंतिम टप्पा एक जूनला पार पडलाय आता नागरिकांना निकालाची उत्सुकता लागलीये... आतापर्यंत नागरिक आपल्या मोबाईलवर किंवा घरातल्या टीव्हीवर बातम्यांमधून निकालाची माहिती जाणून घेत होते.... मात्र आता छोट्या स्क्रीनवर निकाल न बघता मोठ्या स्क्रीनवर हा निकाल पाहता येणार आहे.
नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात असलेल्या मूवी मॅक्स या चित्रपटगृहात लाईव्ह स्ट्रीमिंग वर हा निकाल पाहता येणार आहे... सकाळी नऊ वाजेपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत हा निकाल नागरिकांना पाहता येणार आहे.
हा निकाल पाहण्यासाठी नागरिकांना मात्र 99 रुपयाचे तिकीट काढावे लागणार आहे... अशा पद्धतीत पहिल्यांदाच मोठ्या स्क्रीनवर लोकसभेचा संपूर्ण भारताचा निकाल हा पाहता येणार आहे.
यावर नागरिकांनी देखील आनंद व्यक्त केला असून, आम्ही देखील मोठ्या स्क्रीन वरती निकाल पाहायला जाऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे कॉलेज रोड परिसरातील चित्रपट गृहाची नाशकात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
कोण मारणार बाजी?
लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल काल समोर आले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे अशी लढत आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे पिछाडीवर आहेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.