नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा उच्छाद; महिनाभरात तब्बल ३३ तोळे सोनं लंपास
महिलांच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर चोरांचा डल्ला
किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक शहरातील महिला सध्या दहशतीखाली जगतायत. लग्नसराईचा मोसम सुरू होताच सोनसाखळी चोर सक्रिय झाले आहेत. नाशिक शहरात लॉन्स परिसरात महिलांना चोरटयांकडून टार्गेट केलं जातंय. महिनाभरात तब्बल ३३ तोळे सोनं लंपास करण्यात सोनसाखळी चोर यशस्वी झाले आहेत. विविध ठिकाणी सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटना सीसीटीव्हीत चित्रीतही झाल्या. मात्र पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे.
रस्त्यावरुन जात असताना चोरट्यांनी मंगळसूत्र चोरलं होतं. पोलिसांना लगेच तक्रार दिली होती. सीसीटीव्ही देखील मिळालं होतं. आरोपीदेखील पकडले गेले होते. मात्र, पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप, मंगळसूत्र चोरीला गेलेल्या महिलेकडून करण्यात आला आहे.
सिक्युरिटी गार्डचा अभाव चोरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्यांकडून केला जातोय. तसंच परिसरातील पार्किंगमुळे देखील हे प्रमाण वाढल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी, सोनसाखळी चोरांच्यादृष्टीने शहरांमध्ये ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. त्यासाठी काही वर्दळीच्या ठिकाणचे स्पॉट निश्चित करण्यात आले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सिक्युरिटी गार्ड वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा वाढवण्यासाठी सूचना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
आता या सगळ्या घटनांचं खापर नाशिक पोलिसांनी लॉन्स मालकांच्या डोक्यावर फोडलं असलं, तरी आता वास्तवात पोलिसांकडून याप्रकरणी काय कारवाई होते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आताच्या हेडलाईन्स
'डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन'; पाहा नव्या भूमिकेत देवदत्त नागे
हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात...
World Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, केजरीवालांचे भाजपला आव्हान
'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण
दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल
वनडे सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, विलियमसन २ मॅचसाठी बाहेर
'मोदी सरकारने 'सीट डाऊन इंडिया, शटडाऊन इंडिया, शटअप इंडिया' योजना सुरु कराव्यात'
वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय