चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक : आग कुठेही आणि केव्हाही लागू शकते, अगदी चिंचोळ्या गल्लीतही..... अशा वेळी आग विझवताना ब-याच अडचणी येतात.... त्यासाठीच येवल्यातल्या रँचोंनी एक वेगळी बाईक तयार केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बाईक थोडी खास आहे.  या बाईकची खासियत ऐकून तुम्ही सुद्धा तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. कारण या बाईकला मिनी फायरब्रिगेडचे स्वरुप देण्यात आलंय. कुठेही, अगदी बोळाखोळात, कधीही कोणत्याही क्षणी कसंही पोहचण्यासाठी ही मिनी फायरब्रिगेड सक्षम आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही मिनी फायरब्रिगेड गाडी तयार करण्याची किमया साधलीय.


या गाडीमध्ये दोनशे लिटर पाणी ठेवणं शक्य आहे. पुर्णतः जुन्या वस्तूपासून बनवलेली ही मिनी फायरब्रिगेड गाडी अवघ्या 35 हजारात तयार झालीय. ही मिनी फायरब्रिगेड गाडी तयार करण्यामागेही एक कारण आहे. केवळ आग विझवण्यासाठीच नाही तर शेतक-यांसाठी आणि इतर काही कामांसाठीही होऊ शकतो. विद्यार्थ्यांचा हा प्रोजेक्ट समाजोपयोगी असल्याचं सांगत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही त्यांचं कौतुक केलंय.


चांदवडच्या या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या मिनी फायरब्रिगेडचा वापर केवळ गावागावातच नाही तर मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातही नक्कीच होऊ शकतो. वाहतूक कोंडीमुळे जिथं फायरब्रिगेडच्या गाड्यांना पोहचणं शक्य होत नाही. तिथं ही मिनी फायरब्रिगेड गाडी फायदेशीर ठरु शकते.