Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत, महिलेने केला गंभीर आरोप
Jitendra Awhad Woman Molestation Case : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (maharashtra political news) भाजपच्या महिला पदाधिकारीला ढकलल्याचा (Woman Molestation Case) आरोप करण्यात आला आहे.
Jitendra Awhad Crime News : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. (Maharashtra Political News) गेल्या आठवडाभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता महिलेने विनयभंगाचा आरोप केल्याने (Woman Molestation Case) आव्हाड वादात सापडले आहेत. तसेच हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी (Mumbra Police) आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (अधिक वाचा - 72 तासांत दोन गुन्हे; जितेंद्र आव्हाड यांनी घेतला मोठा निर्णय, त्यांच्या ट्विटची चर्चा)
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या महिला पदाधिकारीला ढकलल्याचा (Woman Molestation Case) आरोप करण्यात आला आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. जितेंद्र आव्हाड हे गर्दीतून सुरक्षा रक्षकांसमवेत जात होते. यावेळी समोरुन एक महिला त्यांच्यासमोर आली. त्यावेळी त्यांना बाजुला केले. त्यानंतर या महिलेने विनभंगाचा आरोप केला आहे. त्यानंतर आव्हाडांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलम 354 नक्की काय आहे?
भारतीय दंड संहिता कलम 354 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करता येतो. कलम 354 आणि कलम 509 स्त्रियांचे विनयभंगापासून संरक्षण करतात. हा गुन्हा हा नैतिक अधःपतनांशी संबंधीत मानला जातो. हा कायदा स्त्रियांच्या हितासाठी आहे.
कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभाच्यावेळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी ही घटना घडली. तसा दावा या पीडित महिलेने केला आहे. या महिलेने म्हटले आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला केले. त्यानंतर या महिलेने तक्रार दिल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याआधी ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या मराठी सिनेमाला विरोध केला. यावेळी प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाणे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना अटक झाली. सध्या आव्हाड जामीनावर बाहेर आहेत. ‘हर हर महादेव’ या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित तथ्यांचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.