नेरळ हत्या प्रकरणाचा 24 तासात उलगडा, मित्रानेच केली हत्या
नेरळ हत्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा झाला आहे.
रायगड : नेरळ हत्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा झाला आहे. 2 आरोपींना पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत. 2 सुटकेसमध्ये मृतदेहाचे तुकडे काल सापडले होते. चार्ल्स जोसेफ नाडर आणि सलोमी पेडराई अशी आरोपींची नावं समोर आली असून हत्या करण्यापूर्वी तिघेही एकत्र दारू प्यायले होते.
दारूच्या नशेत सुशीलकुमार सरनाईक याची त्यांनी हत्या केली. एका आरोपीच्या पत्नीच्या चारित्र्यावर सुशील कुमारने संशय घेतला. त्यामुळे त्या रागातून ही हत्या झाल्याचं आरोपींनी कबूल केलं आहे.
सुशीलकुमार सरनाईक हा एका खासगी बँकेत कामाला होता. नेरळ रेल्वे स्थानकाजवळील गटारात त्याचा मृतदेह सापडला होता. गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे.
मित्रांसोबत विरारला फिरायला जात असल्याचं सांगून सुशील घरुन निघाला होता. पण तो घरी परत आलाच नाही.