रायगड : ब्रिटिशकालीन अमृतांजन ब्रिज इतिहासजमा होणार आहे. उद्यापासून  पुलाचे बांधकाम पाडण्यात येणार आहे. त्यामुळे येथील वाहतूक थांबविण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट असल्याने राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. त्यामुळे या मार्गावर अत्यावश्यक सेवा असणारी वाहने सुरु आहेत. त्यामुळे उद्यापासून येथील वाहतूक बंद राहणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील जुना अमृतांजन ब्रिज नियंत्रित स्फोटकांच्या साहाय्याने पाडण्यात येणार आहे . उद्या  ४ एप्रिलपासून या कामाला सुरुवात होणार असून ते १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे . सध्या लॉकडाऊनमुळे महामार्गावरील वाहने अत्यंत तुरळक असल्याने वेळ साधत हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यासाठी जिल्हाधिकारी यांची आवश्यक परवानगी रस्ते विकास महामंडळाने घेतली आहे . 


बोरघाटातील हा ब्रिटिशकालीन पूल वापरासाठी अनेक वर्षे बंद असला तरी या पुलाखालून एक्स्प्रेस वेने जाणारी वाहने ये जा करीत असतात . त्यामुळे हा पूल कोसळला तर धोकादायक ठरु शकतो .  या पुलाचे पाडकाम सुरु असताना महामार्गावरील वाहतूक लोणावळा - खंडाळा मार्गे सुरुच राहणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.