मुंबई : राज्यात कोरोनाचे 1 हजार 426 नवे रूग्ण सापडले आहेत. तर कालच्या ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही चिंता व्यक्त करण्यात आले.  119 ओमायक्रॉन रूग्णांना लसीकरणानंतरही संसर्ग झाल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे.  संपूर्ण लसीकरणानंतरही ओमायक्रॉनचा धोका असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग होतोय ही धक्कादायक बाब उघड झालीय. राज्यात १६७ ओमायक्रॉनबाधीत आहेत. त्यांच्यापैकी ११९ जणांचं संपूर्ण लसीकरण झालंय. त्यामुळे संपूर्ण लसीकरण झाल्यानंतरही ओमायक्रॉन संसर्गाचा धोका असल्याचं स्पष्ट झाले आहे.



या पार्श्वभूमीवर लसीकरण झालेल्या नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक वर्तनाबाबत गाफील न राहण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, हात धुणे, अंतर राखणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, याची जाणीव सर्वानी ठेवणं आवश्यक आहे. 


कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर कॅबिनेटमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली. गेल्या 20 दिवसांत सक्रीय रुग्णांमध्ये 50% वाढ झालीय. तर गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. तेव्हा लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.