अलिबाग :  रायगड  जिल्ह्यात पदेशातून आलेल्या २१४ जणांपैकीन ४६ लोकांना त्यांच्या घरातच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. १६८ जणांवर वेगवेगळ्या ठिकाणी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत आलेल्या अहवालानुसार यातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात खबदारी घेण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड जिल्‍हयात पनवेल कामोठे येथे सापडलेला एक कोरोना बाधित रूग्‍ण वगळता एकही संशयित रूग्‍ण आढळला नाही . परदेशातून आलेल्‍या नागरीकांना केवळ खबरदारी म्‍हणून निरीक्षणाखाली ठेवण्‍यात आले आहे. कुठल्‍याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका,  असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. 


ग्रामीण भागातील शाळाही बंद, पर्यटन स्थळ- तीर्थक्षेत्र बंद 


 कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर रायगड जिल्‍हा प्रशासनाने आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेतली आहे . दरम्‍यान आता ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे .  विदेशातून येणारयांवर लक्ष ठेवण्‍यासाठी स्‍वतंत्र कक्ष स्‍थापन करण्‍यात आले असून जिल्‍हयात ठिकठिकाणी मिळून 442 जण राहू शकतील अशी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. आपत्‍कालीन परिस्थिती ओढावल्‍यास अन्‍य ठिकाणेदेखील निश्चित करण्‍यात आली आहेत . 



जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यांमध्‍ये विलगीकरण कक्ष सुरू करण्‍यात आल्‍याचे जिल्‍हाधिकारी यांनी सांगितले . सुरूवातीला शासनाने जिल्‍हा परीषदेच्‍या तसेच ग्रामीण भागातील शाळा सुरू ठेवण्‍याचा निर्णय घेतला होता . परंतु आता सर्व प्रकारच्‍या शाळा , म‍हाविद्यालये बंद ठेवण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत . या शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहतील , अशी माहिती जिल्‍हाधिकारी यांनी दिली. 


तर मुंबईतही आणखी एक कोरोनाचा आढळून आला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८वर पोहचली आहे. अमेरिकेतून प्रवास करुन आलेला कोरोना रुग्ण असलेल्या नातेवाईकाच्या संपर्कात आल्यामुळे ही लागण झाल्याचं समोर आलं आहे. 


मुंबईत आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने आता महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ४३वर पोहोचली आहे. आज पुणे आणि मुंबईत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती फ्रान्स आणि नेदरलँडवरून प्रवास करून आली होती. तर मुंबईत पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीला अमेरिकेतून आलेल्या नातेवाईकाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली होती.


कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुंबईत कमीत कमी गर्दी करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पण मुंबईकरांनी मात्र हे फारसं मनावर घेतलेलं दिसत नाहीये. कारण मुंबईतल्या गर्दीवर फार फरक पडलेला दिसत नाही. मुंबईतल्या लोकलमध्ये गर्दी कायम होती. दुसरीकडे रस्त्यावरही वाहनांची संख्या मोठी दिसत होती. बीकेसीसारख्या ठिकाणीही अनेक ऑफिसेस सुरु असल्याचं दिसलं. त्यामुळे मुंबईकरांनी कोरोनाला फारसं गांभीर्याने घेतले नाही का असा प्रश्न पडू लागलाय.


तसेच  सरकारी कार्यालयात यापुढे ५० टक्के उपस्थिती ठेवली जाणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच रेल्वे, एसटी बस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्याचा प्रयत्न असावा अशा सूचना सरकारच्यावतीने करण्यात आल्या आहेत.