रायगड : रायगडमध्ये एका दुर्मिळ प्राण्याचं दर्शन झालंय. रायगडमध्ये काळ नदीच्या पात्रात चक्क पाणमांजरं पाहायला मिळत आहेत... तसं या पाणमांजरांचं वास्तव्य बऱ्याच नद्यांमध्ये असतं... पण पाण्याखालीच त्यांचं विश्व असल्यानं ती सहसा दिसत नाहीत... पाण्याखाली राहणारी ही पाणमांजरं अवघ्या पंधरा ते वीस सेकंदांसाठी बाहेर येतात.... आणि लगेच डुबकी मारुन आत गुडूप होतात. पण सध्या ही पाणमांजरं बराच वेळ पाण्याच्या बाहेर आलेली दिसतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशी पाणमांजरं पाहण्याचा योग माणगावकरांना आला.... काळ नदीमध्ये पाणमांजरांचा वावर वाढलाय. 


विशेष म्हणजे नदीचं पाणी जर शुध्द असेल तरच हा प्राणी त्या नदीत राहातो... त्याचबरोबर पाणमांजराच्या वावरामुळे नदीचं पाणी शुद्ध होतं.... कारण खराब झालेले किंवा मेलेले मासे ही पाणमांजरं खाऊन टाकतात... त्यामुळे या पाणमांजरांना 'नदीचा राजा' म्हणून ओळखलं जातं.