पुणेकर PMPML ने प्रवास करताय तर सावधान, या प्रवाशाचं काय झालं पाहा
पुण्यात स्पीड ब्रेकवर बस आदळली आणि प्रवाशाची अशी वाट लागली
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : भरधाव वेगात जाणारी बस गतीरोधकावर जोरात आदळल्याने एका प्रवाशाच्या मणक्यात गॅप पडला. या प्रवाशांने थेट पोलिसात धाव घेत चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पुण्यात ही घटना घडली असून या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नेमकी काय घटना?
राजू चिंचवडकर असं तक्रारदार प्रवाशाचं नाव असून ते 62 वर्षांचे आहेत. राजू चिंचवडकर पीएमपीएमएल (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) बसने लोहगाव ते कात्रज असा प्रवास करत होते. बस चालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत वेगात बस चालत असल्याचा आरोप राजू चिंचवडकर यांनी केला आहे.
स कात्रज इथल्या सर्प उद्यानासमोर आली असताना चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात बस चालवली. समोर गतिरोधक असतानासुद्धा ब्रेक न लावल्याने त्यावरून बस जोरात आदळली.
बसच्या वेगामुळे गतिरोधावर आदऴून बसमध्ये मागे बसलेल्या राजू चिंचवडकर यांच्या मणक्यात गॅप पडला. या घटनेला चालकच जबाबदर असल्याचा दावा करत त्यांनी चालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात पीएमपीएलबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी पीएमपीएल व्यवस्थापनाकडे केल्या असल्या तरी ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.