Petrol Diesel Price Today in Marathi : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होताना दिसताना आहे. केंद्र सरकारने निवडणूकीपूर्वी कच्चा तेलाच्या किंमतीत बदल केला आहे. या बदलामुळे थोडफार का होईना ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तुम्ही जर आज (21 मार्च) गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की तपासा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर दुसरीकडे ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $85.60 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $86.39 वर व्यापार करत आहे. महाराष्ट्रात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडाफार बदल झाला असून पेट्रोल 104 रुपयांनी विकले जाणार आहे. तर डिझेल 92 रुपये प्रतिलिटारने विकले जाईल. त्याचबरोबर आज नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 87.62 रुपये आहे. तसेच कोलकात्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 103.94 रुपये आणि डिझेलचा दर 90.76 रुपये आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.34 रुपये प्रति लिटर आहे.


महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर 


मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये आणि डिझेलचा दर 92.51 रुपये प्रतिलिटर आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 104.38 रुपये तर डिझेलचा दर 90.90 रुपये आहे. आज नाशिकमध्ये पेट्रोल 104.69 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचे दर 91. ते 20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर 104.55 रुपये तर डिझेलचा दर 91.09 रुपये प्रतिलिटर आहे. तर छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 106. 84 रुपयांना विकले गेले असते. डिझेल 93.60 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.


घरबसल्या जाणून घ्या आजचे दर


तुम्ही घरबसल्या ही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासू शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP आणि तुमचा शहर कोड लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा, BPCL ग्राहकाने RSP आणि शहर कोड लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे सर्व माहिती दिली जाईल. HPCL ग्राहकाला HPPprice आणि शहर कोड लिहून 9222201122 वर पाठवावा लागेल.