मुंबई: दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोलनं सर्वसामन्य नागरिकांचं बजेट तर केव्हाच कोलमडलं. इतकच नाही तर आता कंबरडं मोडायची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील एक जिल्ह्यात तर पेट्रोल 105 रुपये लिटरपर्यंत पोहोचलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी नागरिकांना 103 रूपये 36 पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलच्या किंमती 95रूपये 44 पैशांवर पोहोचल्या आहेत. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेल कडाडलं आहे. अमरावतीत पेट्रोल 104.81  रूपये झालं आहे. 



राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर


मुंबई- पेट्रोल 103. 36 प्रतिलिटर, डिझेल- 95. 44


परभणी- पेट्रोल 105,70 , पॉवर पेट्रोल- 109.11, डिझेल- 96.22


औरंगाबाद पेट्रोल 104. 44, डिझेल- 94.63


नागपूर- पेट्रोल 103.21, डिझेल 93.86


अमरावती- पेट्रोल 104.81, डिझेल 96.92


पुणे पेट्रोल 103.02 डिझेल 93.63


पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.