मुंबई : साता-यातील धोम धरणात बुडून पीएच.डी करणा-या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमजीत शहा आणि अविनाश दुनेड अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. हे दोन्ही विद्यार्थी मुंबईमधील टाटा इन्सिटीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च या कॉलेजचे पी.एचडीचे विद्यार्थी होते. एकुण चार विद्यार्थी या धोम धरणावर आले होते. रिसर्च प्रोजेक्टसाठी धरणाचा अभ्यास करण्यासाठी हे विद्यार्थी इथं आले होते.


वाईपासून 30 किलोमीटर अंतरावर असणार्‍या कोंढवली गावच्या हद्दीत आल्यानंतर या चौघांपैकी दोघांनी पोहण्यासाठी धरणात उड्या टाकल्या. मात्र या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गाळात अडकले...आणि त्यांचा मृत्यू झाला.