औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बुधवारी एका घटनेने संपूर्ण शहर हादरलं होतं. सातारा परिसरातील कनकोरबेन नगर येथे बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. ही घटना रात्री ८:३० च्या दरम्यान समोर आली. जेव्हा घरातील इतर व्यक्ती घरी परतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धक्कादायक म्हणजे या घटनेत नातेवाईकांनीच या दोघांचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे. चुलत भावाने आपल्या भाऊजीच्या मदतीने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. घरातील दीड किलो सोन्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं तपासात पुढे आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१६ वर्षाचा सौरभ खंदाडे दहावीत तर १८ वर्षाची किरण खंदाडे बीए प्रथम वर्गात शिकत होती. सकाळी या मुलांची आई आणि मोठी बहिण कारने पाचनवडगावला गेले होते. त्यामुळे किरण आणि सौरभ हे दोघेच घरी होते. रात्री जेव्हा कुटुंबातील व्यक्ती घरी परतले तेव्हा घरचा दरवाज नुसता लोटलेला होता. पण जेव्हा ते बाथरुममध्ये पोहोचले तेव्हा किरण आणि सौरभ हे मृत अवस्थेत पडले होते. तसेच घरातील दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग आणि रोख रक्कम गायब होती.


या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी २४ तासांच्या आत या घटनेचा तपास केला आणि आरोपींना पकडलं. पोलीस अधिक चौकशी करत आहेत.