शिवसेना, काँग्रेसला दे धक्का, हे नगरसेवक जाणार भाजपात
जिल्ह्यातील पालिकेत राजकीय भूंकप झालाय. एकूण ९ नगरसेवकांनी राजीनामा देत भाजपचा रस्ता धरलाय. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेय.
नांदेड : जिल्ह्यातील पालिकेत राजकीय भूंकप झालाय. एकूण ९ नगरसेवकांनी राजीनामा देत भाजपचा रस्ता धरलाय. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेय.
शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी राजीनामा मातोश्रीवर पाठवलाय. तसेच युवासेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनी ही राजीनामा दिलाय. तसेच तीन नगरसेवकांनीही राजीमाना दिलाय.
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु असताना याची लागण काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही झालेय. काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिलेत.
पालिकेत आतापर्यंत ९ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहे. यात कॉंग्रेसचे ४, शिसेनेचे ३, राष्ट्रवादीच्या २ नगरसेवकांनी राजीनामे दिले असून हे सर्वजन भाजपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती देण्यात आलेय. त्यामुळे पलिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा धक्का मानला जात आहे.